राज्याचे एक वजनदार मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यात शाई फेकली गेली. तमाम मराठी माणसाने वा प्रसंगाची चित्रफीत पाहिली. ती शाई पाटलांच्या डोळ्यावर पडली. त्यावेळी तिथे जो गोंधळ उडाला, त्यात चंद्रकांतदादा तोल जाऊन पडलेही असते परंतु अनेकांनी त्यांना आधार दिल्यामुळे तो एक अनर्थ टळला. Shaifek …. So what about the general? Chandrakant Patil is the one who gives strength to the attackers
मंत्र्यांभोवती सुरक्षेचे कडे असते. अशातही काही टगेखोरांनी शाई फेकण्याची हिम्मत दाखवली आणि घोषणाबाजी केली. सामान्य तरुण असे विकृत कृत्य कदापिही करणार नाही. ज्यांनी हा उद्योग केला, ते नक्कीच राजकीय नेत्यांचे बगलबच्चे नक्कीच असणार. कारण राजाश्रय असल्याखेरीज इतकी हिम्मत त्यांच्यात येऊच शकणार नाही. सोलापुरात अँड.. गुणरत्न सदावर्ते यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अंगावर काळी पावडर फेकली आणि हे कृत्य आम्हीच केले, असे सांगण्याचे धाडसही केले. ही संघटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयाला असणारी आहे. असा प्रकार घडला की पोलीस त्यांना ताब्यात घेतात. न्यायालयात जामीनही मिळतो आणि असा प्रताप करणारे बाहेर छाती फुगवून हिंडत असतात. हा मोकाटपणाच त्यांना बळ देणारा असतो.
चंद्रकांतदादांच्या प्रकरणात कोण होते ही माहिती उजेडातही आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पण राष्ट्रवादीचे नेते आमचा त्यात हात नाही, असे सांगून मोकळे होतीलही. आम्ही मागे एकदा म्हटले होते की-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी भूमीत हे काय चालले आहे. राज्यात वाचाळवीरांची बजबजपुरी माजली आहे. मनगटशाही बळावत चालली आहे. हे सारे प्रकार पाहून आम्ही आमची उद्विग्नता त्या प्रश्नातून व्यक्त केली होती परंतु आपल्या राज्यातील राजकारण्यांच्या वर्तनात काहीच फरक पडलेला दिसत नाही ही अत्यंत खेदाची बाब म्हणावी लागेल.
चंद्रकांतदादा हे बहुजन वर्गातून वर आलेले नेतृत्व कोल्हापूरची भाषा तशी कडक आणि गरमही असते. प्रदेश रचनेनुसार जे ते नेते बोलताना आपली बोलीभाषा वापरत असतात. म. फुले आणि डॉ. बाबासाहेब यांनी पदर पसरून शिक्षण संस्था उभ्या केल्वा, असे चंद्रकांतदादा म्हणायला हवे होते परंतु नेहमीच्या शैलीत बोलताना भीक असा शब्द वापरला गेला. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटले गेले. भीक हा शब्दप्रयोग चुकला असेल. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गदारोळ केल्यानंतर चंद्रकांतदादांनी माफी मागितली असती परंतु त्यांच्यावर शाई फेकण्याचा झालेला प्रकार निषेधार्हच आहे. जो कोणी शाईफेक करेल, त्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या १४ कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल झाल्याने वा कारस्थानामागे कुठला पक्षाचे पाठबळ आहे हे आता लपून राहिलेले नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
BJP leaders destroying history of Maharashtra’s heroes. Shameful #chandrkantpatil #Resign @ss_suryawanshi https://t.co/hHizn0QV6q
— AAP Belgaum (@AAPBelgaum) December 11, 2022
चंद्रकांतदादा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मोर्चा काढत जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल, त्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिलं जाईल, असं चिथावणीखोर भाषणही केले गेले. एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढची हिम्मत बघा. शाईफेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज परबडेला दिलं जाईल हा व्हिडिओ देखील या कार्यकत्यांकडून व्हायरल केला गेला.
ज्यांनी हे कृत्य केले, त्यातील तिघांना अटक केली गेली पण त्याअगोदर पोलिसांनी खाक्या दाखवत ‘प्रसाद’ दिला. पण हे टगे कोडगे असतात. चपलीने मारले तर पोळीने मारले, असे काहीजण म्हणत असतात. त्यातला हा प्रकार आहे. बाहेर आल्यानंतर हे तिघे पुन्हा उजळ माथ्याने समाजात भटकत राहतील. कारण राजकीय आश्रयाची मस्ती अशांच्या अंगात भिनलेली असते. शाईफेक करा म्हणून फर्मान सोडले जात असेल तर आता मंत्र्यांचीच सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे म्हणावे लागेल.
मंत्री जिथे दौऱ्यावर जातात, तिथे सामान्य माणूस भेटायला जात असतो. तेव्हा असे प्रकार होत असतील तर सामान्यांचीही सुरक्षा धोक्यात येऊ शकते. राष्ट्रवादीचेच बिंग फुटल्याने हा प्रकाराचा निषेध अजितदादा कोणत्या तोंडाने करतावेत? विचाराचा लढा विचाराने व्हावा, असा आपल्या लोकशाहीचा सिद्धांत आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात जे काही चालले आहे, ते पाहाता हा सिद्धांतच पायदळी तुडवला जात आहे. राजकारण्यांची ही कृती पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही.
📝 📝 📝