● चीनकडून परत लपवाछपवी
● भारतासाठी जानेवारीतील 14 दिवस महत्त्वाचे
नवी दिल्ली : चीनवरून आग्रा येथे 23 डिसेंबर रोजी आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. भारतात आल्यानंतर या व्यक्तीने खासगी लॅबमध्ये जाऊन कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे कळताच आरोग्य विभागाने संबंधित व्यक्तीचे घर गाठले व ते सील केले आहे. Corona test of 110 passengers; A person who came to India from China should hide the positive back
चीनमध्ये सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी तर 20 दिवसात तब्बल 24 कोटी कोरोना रुग्णांची नोंद चीनमध्ये झालीये. चीनहून परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यांची BF.7 चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आग्रामध्ये 40 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला त्याच्या घरीच अलगीकरणमध्ये ठेवण्यात आलं आहे. आग्र्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी आज रविवारी याबाबत माहिती दिली. त्या व्यक्तीचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लखनऊला पाठवण्यात येणार असल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती 23 डिसेंबर रोजी चीनवरून दिल्ली मार्गाने अग्र्याला पोहोचला होता. ज्यानंतर त्याने लॅबमध्ये त्याची तपासणी करून घेतली. श्रीवास्तव यांनी सांगितलं की, या व्यक्तीचा कोरोना अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या दिवशी 110 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती जेनेस्ट्रिंग्स डायग्नोस्टिक सेंटरने दिली आहे. हे सर्व प्रवासी बाहेरील देशांमधून भारतात आले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची रँडमली कोरोना चाचणी करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले होते. त्यानंतर देशातील विमानतळांवर प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
चीनसह जगभरात कोरोनाने चिंता वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट झाले आहे. अशातच आता एम्सचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी मोठे विधान केले आहे. देशात करोनाची नेमकी काय स्थिती असेल याचा अंदाज घेण्यासाठी जानेवारी महिन्यातील पहिले 14 दिवस महत्त्वाचे असतील, असे ते म्हणाले. ज्यांनी बुस्टर डोस घेतला नाही, त्यांनी आता तो घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीननं पुन्हा लपवाछपवी सुरु केलीये. यापुढे चीनच्या आरोग्यविभागाला रुग्णसंख्या जाहीर करता येणार नाहीत असा निर्णय चिनी सरकारनं घेतलाय. चीनच्या रुग्णसंख्येची माहिती ही रोग नियंत्रण केंद्र म्हणजेच सीडीसीकडून जाहीर केली जाईल असं सांगण्यात आलंय. चीनच्या आरोग्य विभागाचा एक अहवाल लीक झाला होता. ज्यात एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर चीनी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
झीरो कोव्हिड पॉलिसी शिथील केल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भयावह बनत गेली. पुढच्या 3 महिन्यात 60% नागरिकांना कोरोना होणार असल्याची भीती वर्तवण्यात येतेय. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकीत कोरोनासंदर्भातली आकडेवारी ठेवण्यात आली होती. 20 मिनिटं चाललेल्या या बैठकीतली कागदपत्रं लीक झालीत. लोकांपर्यंत सत्य समोर येण्यासाठी कोण्या अधिका-याने ही माहिती लीक केल्याचा आरोप आहे. एका ब्रिटीश दाव्यानुसार चीनमध्ये रोज 5 हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय, तर दरदिवशी 10 लाखांहून अधिक लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत.
● रुग्णसंख्या जाहीर करणार नाही चीन
चीनमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने या पार्श्वभूमीवर चीनमधील दररोजची कोविड रुग्णसंख्या जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये एकाच दिवशी तब्बल 3 कोटी 70 लाख रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरातील देश कोरोनामुळे सतर्क झाले असून सुरक्षा उपाययोजना करत आहेत.
● महाराष्ट्र – या मंदिरात मास्कसक्ती
– कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातही मास्क शिवाय प्रवेश नाही.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातही मास्क घालूनच
– नाशिकच्या सप्तशृंगी मंदिर परिसरात नो मास्क, नो एंट्री
– नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क घालणं बंधनकारक
मंदिरात प्रवेश करण्याच्या सूचना.