○ श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप : पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा संकल्प
सोलापूर : सोलापूर शहराला स्वच्छ, नियमित वेळेत, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याचा प्राधान्याने प्रयत्न राहणार आहे. येत्या पंधरा दिवसात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. Additional Commissioner Sandeep Karanje presented the vision of Solapur city development Municipal water supply श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त कारंजे बोलत होते. यावेळी त्यांनी सोलापूर शहराच्या विकासाचे व्हिजन मांडले. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज यासह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कारंजे म्हणाले, सोलापूर महापालिकेत गेल्या २८ वर्षापासून कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त या पदावर काम केले आहे. यामुळे शहराचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे. शहराच्या विविध गरजा, उणिवा माहिती आहेत. शहर प्रगतीच्या मार्गावर आहे. शहराच्या भौगोलिक स्थितीमुळे विविध अडचणी निर्माण होत आहे. त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहराची मुख्य गरज आहे ती म्हणजे सुरळीत पाणीपुरवठा. महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्या दृष्टीने शहराचा पाणीपुरवठा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाणीपुरवठा स्वच्छ, वेळेत आणि पुरेशा दाबाने करण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न राहिला आहे. आयुक्तांनी पदोन्नती देऊन सार्वजनिक आरोग्य अभियंतांची नियुक्ती केली आहे. यामुळे ते पाणीपुरवठा सुरळीत करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सोलापूर शहराचे वॉटर ऑडिट तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांच्या कार्यकाळात करण्यात आले. यामध्ये ४२ टक्के पाणी अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तो कमी करण्यात येत आहे. स्काडा प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. येत्या १५ एप्रिलपासून स्मार्ट सिटीच्या एबीडी एरियामध्ये स्काडा प्रणाली कार्यान्वित होईल. यामुळे पाणीपुरवठा नेटक्या पध्दतीने होईल आणि चावीवाल्यांवर अवलंबित्व कमी होणार आहे. बोगस नळ कनेक्शनचा सर्वेक्षण केला आहे. बोगस नळ मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. दोन टप्प्यात पैसे भरून घेऊन नळ कनेक्शन देण्याचा प्रयत्न आहे तसेच ग्रुप नळ कनेक्शन ही चार कुटुंबामध्ये देण्याची योजना आहे. या संदर्भात जनजागृतीही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बोगस नळधारकांवर यापुढे कडक कायदेशीर कारवाई हाती घेण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील बस सेवा सुरळीत करण्याचाही विचार केला आहे. सध्या शहरात १५ बसेस धावतात. त्याची संख्या वाढवून तीसवर नेण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले. अमृत २ योजनेचा डीपीआर करण्यात येत आहे. त्यास सप्टेंबर अखेरपर्यंत शासन मंजुरी मिळणार आहे. ५३२ कोटीची ही योजना आहे. मंजुरीनंतर तीन वर्षात ही योजना पूर्णत्वास येईल. नवी ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे माझ्या कार्यकाळात ही योजना मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विचार मंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस समाधान वाघमोडे, प्रशांत माने आदी उपस्थित होते.
○ महापालिकेचे पाणी आरओ प्लांट पेक्षाही अधिक शुद्ध
उजनीतून शहराला येणारे पाणी शेवाळयुक्त व रसायन मिश्रित आहे. त्याचबरोबर त्यात मातीचे प्रमाणही आहे. यामुळे पिवळसर रंग या पाण्याला आल्याचे दिसून येते. ट्रीटमेंट प्लांटमध्ये पाण्यात तुरटी व पावडरचा डोस वाढविण्यात आले आहेत. दरम्यान, सोलापूर शहरात आठशे ठिकाणी पाणी तपासणी केली जाते. भवानी पेठ येथेही अत्याधुनिक अशी लॅब आहे. तिथेही पाणी तपासणी केली जाते. शहराला शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. शहरात महापालिकेचे पाणी आरओ प्लांट पेक्षाही अधिक शुद्ध आणि आरोग्यदायक आहे.
● लवकरच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे प्राधान्याने लक्ष आहे. गेल्या महिन्यापर्यंत शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. सध्या तांत्रिक कारणास्तव चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची साठवण क्षमता कमी आहे. ४२ टक्के विविध कारणास्तव पाणी गळती आहे. ही गळती कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न राहणार आहे. उपाययोजना करण्यात येत आहेत. यामुळे येता पंधरा दिवसात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विद्युत पुरवठ्यात अडचण येत असल्यानेही पाणीपुरवठा विस्कळीत होतो, असेही अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी स्पष्ट केले.