सोलापूर : भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील हे तब्बल ५ वर्षांनी एकत्र एका व्यासपिठावर पाहावयास मिळाले. निमित्त होते बसवंती स्मृती पुरस्कार पत्रकार परिषदेचे. या पत्रकार परिषदेत प्रा. निंबर्गी आणि सुरेश पाटील या दोघांनीही आता आमच्यामध्ये आता कोणतीही कटूता राहिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. Prof. Ashok Nimbergi – Suresh Patil together after five years; BJP Solapur explained that now there is no difference, no bitterness
बसवंती पुरस्काराचे आयोजन १० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे या निमित्त मंगळवारी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला प्रा. अशोक निंबर्गी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, मयूर बसवंती आदी उपस्थित होते.
काही वर्षांपूर्वी सुरेश पाटील यांनी आपल्यावर विष प्रयोग झाला असून त्यामध्ये प्रा.निंबर्गी यांच्यासह पाचजणांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपमध्ये बराच गदारोळ झाला होता. ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेपासून सुरेश पाटील आणि निंबर्गी यांच्यात दुरावा आला होता. मात्र बसवंती स्मृती पुरस्काराच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने हा दुरावा मिटल्याचे दिसून आले.
यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, आपल्यात आणि अशोक निंबर्गी यांच्यात आता कोणतीही कटुता राहिली नाही. झाले गेले गंगेला मिळाले. आपल्यावर विष प्रयोग झाला आणि तो करण्यामागे प्रा. निंबर्गी यांच्यासह आपण काही जणांची नावे घेतली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पाणी गळती थांबण्यासाठी उपाय योजना करणार
– मनपा आयुक्त शितल तेली उगले यांची माहिती
सोलापूर : सोलापूर शहरात पाणी गळती ही दररोज 42 टक्के होत आहे. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त शितल तेली उगले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
सोलापूर शहरात सध्या चार दिवसात पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे कमी दाबाने पाणी येत आहे. तर काही ठिकाणी पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणी गळतीवर रोख लावण्यासाठी महापालिका उपायोजना करणार आहे. सोलापूर शहराला दररोज 200 एमएलडी पाणी दररोज उपसा होत असतो. मात्र त्यातून 42 टक्के पाणी गळती होत आहे. त्यामुळे गळती कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन उपाययोजना करणार असल्याचेही मनपा आयुक्तांनी सांगितले.
● बोगस पाईप कनेक्शन शोधणार
सोलापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी गळती रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील बोगस पाईप कनेक्शन शोधणार. त्याचबरोबर गंजलेले, खराब झालेले पाईप बदलण्यात येणार आहेत़. यासाठी पाच कोटीचा खर्च होणार असून त्याची तजवीज करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी लवकरच टेंडर काढणार असेही मनपा आयुक्त शितल तेली उगले यांनी सांगितले.
● बोगस नळाचा शोध घेणार
सोलापूर शहरात विनापरवानगी बोगस नळ बसवण्यात आलेले आहे. अशा बोगस नळ कनेक्शन चा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही मनपा आयुक्त उगले यांनी सांगितले.
○ शटडाऊन | शेळगी व विडी घरकुल भागातील पाणीपुरवठा होणार विस्कळीत
सोलापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 33 केव्ही सोलापूर सर्किट एक आणि दोन मेंटेनन्स कामाकरिता दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत शटडाऊन घेण्यात येणार आहे. यामुळे भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र येतील वीजपुरवठा खंडित होणार असल्याने शेळगी व विडी घरकुल परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 33 केव्ही सोलापूर सर्किट एक आणि दोन मेंटेनन्स कामाकरिता दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र येथील पंप हाउस करिता 11 केव्ही भवानी पेठ सबस्टेशनहून येणारी 11 केव्ही लाईन बंद होणार आहे. त्यामुळे विडी घरकुल आणि शेळगी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
त्यामुळे दि. 5 एप्रिल रोजी शेळगी, विडी घरकुल येथील व आजूबाजूच्या परिसरात भागातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ आणि कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.