सांगोला : सोलापूरच्या सांगोल्यामधील घेरडी मेटकरवाडी येथे दारूच्या नशेत नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. तसेच त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. सिध्दराम कारंडे आणि सोनाली कारंडे असे मृतकांची नावे आहेत. Solapur. Sangola Gherdi took his drunken wife and drowned in the well किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावरून दारूच्या नशेत असलेल्या सिध्दरामने सोनालीला शेतातील विहीरीत ढकलले आणि नंतर स्वत: विहिरीत उडी मारत जीवन संपवले.
पती-पत्नीच्या झालेल्या वादात व दारूच्या नशेत पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन स्वतः ही विहिरीत बडून पती- पत्नी मृत्युमुखी पडल्याची घटना मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. या घटनेमध्ये सिध्दाराम सुभाष कारंडे (वय २८) व सोनाली सिद्धाराम कारंडे (वय २५, रा. मेटकरवाडी, पेरडी ता. सांगोला) हे पती पत्नी मृत्युमुखी पडले आहेत. लक्ष्मण बाबू आलदर (रा. मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराशेजारी त्यांच्या मेहुण्याचा मुलगा सिध्दाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली असे त्याची आजीसह राहत होता. सिध्दाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दिनांक १३ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारावरून शेजारी राहणारी सोनाली कारंडे हे त्यांच्या शेतात गेलेली दिसली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून सिध्दाराम हाही गेला. त्यावेळेस तो दारू पिलेला होता. पती-पत्नीमध्ये वाद चालू होता. थोड्या वेळाने फिर्यादीही त्यांच्या पाठीमागे गेला असता सिध्दाराम हा सोनाली हिला शेतातील विहिरी जवळच मारहाण करत होता.
या वादातच सिध्दाराम यांनी त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. यावेळी फिर्यादीने पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सिध्दाराम याने विहिरीत उडी मारली व आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले. फिर्यादीने आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीच्या कडेवर आला. परंतु या वेळेमध्ये सिध्दाराम याने आपल्या पत्नीला पाण्यात बुडवले व स्वतःही बुडून दोघांचा मृत्यू झाला.
विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे फिर्यादीलाही वर येता येत नव्हते. सायंकाळी सातच्या सुमारास लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकल्यानंतर फिर्यादी लक्ष्मण आलदर यांनी विहिरीतून आवाज दिला. आवाजावरून लोकांनी फिर्यादीस व पती- पत्नीचे प्रेतं विहिरीबाहेर काढले. या घटनेची फिर्याद लक्ष्मण अलदर यांनी सांगोला पोलिसात दिली आहे.