पुणे : पुण्यात बागेश्वर महाराजांची भेट घेतल्यामुळे बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. “फडणवीसांना बागेश्वर महाराज महत्त्वाचे वाटत असतील म्हणून ते पुण्याला गेले. तुकाराम महाराज हे वैचारिक संत होते तर बागेश्वरबाबा चमत्कारीक संत आहेत. ‘Bageshwarababa’ who insulted Saibaba and Tukaram Maharaj, loved Pune by Fadnavis साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे आज त्यांचेच दर्शन घेत आहेत. तसेच बागेश्वरबाबा प्रति आस्था अधिक असणे हे फडणवीसांचा व्यक्तिगत प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.
आमदार बच्चू कडू यांना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणीस यांना बागेश्वर महाराज महत्वाचे वाटत असतील. त्यामुळे ते पुण्याला गेले. तुकाराम महाराज वैचारिक संत होते. तर बागेश्वर महाराज चमत्कारी संत आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले, “महाराष्ट्र सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. साई बाबांच्या नगरीत त्यांचाच अपमान करणाऱ्या बागेश्वरबाबा प्रती फडणवीसांची आस्था अधिक असू शकते. त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे.”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
साईबाबा आणि तुकाराम महाराज यांना बागेश्वरबाबा बोलत होते. मात्र ते आता तुकाराम महाराजांचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे सर्व संपलं. प्रत्येकाच्या भावना असताना कुणी चमत्काराला मानतं कुणी नाही मानत, असे बच्चू कडू म्हणाले.
पुण्यात बागेश्वर महाराज यांचा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे नेते जगदीश मुळीक हे या कार्यक्रमाचे आयोजक आहे. आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबांच्या सत्संग सोहळ्या हजेरी लावून दर्शन घेतलं. यावेळी, बागेश्वर बाबांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबांच्या सत्संगला हजेरी लावली, यावेळी बागेश्वर बाबांनी फडणवीस यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन, म्हणत राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. आज पुण्यामध्ये सत्संग सोहळ्यात बागेश्वर बाबांनी फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.