○ नव्या साडेतीन हजार बससाठी शिंदेंची मान्यता
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले जात आहेत. ‘Apa Dawakhana’ ST Corporation for common citizens at bus stands of the district आता हा ‘आपला दवाखाना’ मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. नवीन वर्षात 3 हजार 495 एसटी बसेस सेवेत दाखल होतील, असेही ते म्हणाले.
राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल शिंदे यांनी अभिनंदन केले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. वेळी परदेशी शिक्षण अग्रिम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळात नवीन वर्षात 3 हजार 495 नव्या बस सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना स्टॉल देण्याचे आदेशही शिंदेंनी दिले आहेत. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना करण्याची सरकारची योजना आहे.
राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २२०० तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.