सोलापूर : माजी खासदार राजू शेट्टी हे आजपासून पुढील तीन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यभर त्यांनी बळीराजा हुंकार यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा कृषीतज्ज्ञ शरद पवार यांनी उसशेती करणा-या शेतकऱ्यांना आळशी म्हटल्यावर राजू शेट्टी यांनी हे चुकीचे असल्याचे म्हणत या आळशी लोकांच्या जीवावरच महाराष्ट्रातली साखर कारखानदारी उभी असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याला आळशी पीक म्हटलंय, त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नदी ओलांडल्यानंतर नावाड्याला जशी शिवी दिली जाते तसा हा सर्व प्रकार आहे. शरद पवार हे दहा वर्षे कृषीमंत्री होते. त्यांना हे माहिती पाहिजे की, ऊस हे एकमेव असं पिक आहे, ज्याला कायदेशीर हमीभावाचे सरंक्षण आहे. आम्ही इतर पिकांना देखील हमीभाव सरंक्षण मागतोय. परंतु, शासनाने जाहीर केलेले हमीभाव केवळ कागदावर राहतात. तुम्ही हमीभावाला सरंक्षण दिलं असतं तर उसा ऐवजी दुसरं पिक घेण्याचा सल्ला देता आला असता, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच उत्पादन घेण्यासाठी काय काय करावं लागत हे पवार साहेबांना अजून माहिती नाही, 18 महिने ऊसाची जोपासना तळ हातांच्या फोडाप्रमाणे करावी लागते. उसाच्या लागणी पूर्वी तीन महिने मशागत, पूर्वमशागत, हिरवळीच्या खताच नियोजन, रात्री- अपरात्री पाण्यासाठी शेतात जाण, रासायनिक खत फवारण, बांगलनी करण, बरणी, साऱ्या सोडण, वाकूडी मारण, कारखान्यात नोंदीसाठी चिटबॉय संचालक मंडळाच्या माग हिंडण, उसाच्या तोडीसाठी हातापाया पडणं, त्यांना ढाब्यावर नेऊन पार्ट्या देण, ऊस कारखान्याला गेल्यानंतर त्याची एफआरपी मिळवण्यासाठी आंदोलन करण, मोर्चे काढणं, पोलिसांच्या लाट्याकाट्या खाण, केसेस अंगावर घेणं, कोर्टाचे हेलपाटे करण हे सगळं ऊस उत्पादक शेतकऱ्याला करावे लागत आहे.
Raju Shetty, a sugar factory in Maharashtra, lives on the lives of lazy people
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यामुळे उसाला आळशी शेतकऱ्याच पीक म्हणणं चुकीचंय.. या उलट याचं आळशी लोकांच्या जीवावर आज महाराष्ट्रातली कारखानदारी उभी राहिलेली आहे. या महाराष्ट्रातल्या कारखानदारीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय, तर जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे करून जे लोक बांडगुळासारखं वाढतायत त्यांचा मूळ पोशिंदा हा ऊस उत्पादक शेतकरीच आहे. त्याला आळशी म्हणणं ही अतिशय दुर्दैवाची आहे. आणि शेतकऱ्याला हे पसंत पडलेल नाही.
□ हमीभावाचं कायदेशीररीत्या संरक्षण असल्याने ऊसशेती
राजू शेट्टी म्हणाले की, “शरद पवार साहेब हे 10 वर्ष कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्वात जास्त शेतीमधलं कळत, पण त्यांच्या एक गोष्ट ध्यानात यायला पाहिजे की, ऊस हे असं एकमेव पीक आहे.
ज्याला हमीभावाचं कायदेशीररीत्या संरक्षण आहे. बाकीच्या पिकांचा हमीभाव हा कागदावर राहतो. प्रत्यक्षात बाजारामध्ये हमी भावपेक्षा कमी किंमतीने शेती माल विकावा लागतो. इतर पिकांच्या तुलनेमध्ये उसला कमी फायदा होतो. पण तो शाश्वत फायदा होतो. मात्र, आर्थिक सुरक्षिततेमुळे, दराच्या निश्चिततेमुळे शेतकरी उसाकडे वळतो.
□ पवार कुटुंबीयांनी 23 कारखाने घातले घशात
तुमचा रोहित लई शहाणा निघाला. तो मताची शेती करतो. कन्नड साखर कारखाना घशात घालून तो अती कष्टाळू झाला आहे. शरद पवार कुटुंबीयांनी 23 कारखाने घशात घातले आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. एफआरपी व दिवसा विजेसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असेही ते म्हणाले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हुंकार यात्रा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते. शेट्टी म्हणाले, दिवसा शेतीसाठी वीज मिळावी ही आमची रास्त मागणी आहे. यासाठी कोर्टात जाणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने शेतकरी भरडला जात आहे. तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे, तर शिल्लक साखरेवर नाबार्ड कडून थेट कर्जपुरवठ्यासाठी प्रयत्न केलात तर शेतकरी सुखी होईल.