मुंबई : काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होत आहे. त्याआधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंब बाहेरील व्यक्ती अध्यक्ष होऊ शकतो ही चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात सोलापूरचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचे नाव आघाडीवर आहे. मात्र शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कोणता निर्णय होणार?
उत्तर प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस या नात्याने गांधी कुटुंबाच्या विश्वासू वर्तुळात समाविष्ट झालेले सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे यूपीएच्या सत्ताकाळात केंद्रीय गृहमंत्रिपद, लोकसभेचे सभागृह नेतेपदही सोपविण्यात आले होते.
सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत यांची नावं शर्यतीत असल्याचं समजतं. अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक असल्याने काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील एका गटाकडून सुशील कुमार शिंदे यांच्या नावाचे संकेत मिळत आहे. पण सुशीलकुमार शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नेतृत्वाचा मुद्दा शांत करण्यासाठी जुन्या जाणत्या ज्येष्ठ व्यक्तीकडे अध्यक्षपद आणि गांधी कुटुंबातील किंवा कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे कार्यकारी अध्यक्षपद दिले जाऊ शकते. अध्यक्षपदासाठी सहमतीचा उमेदवार म्हणून महाराष्ट्रातील नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचेही कळते. तर, प्रियांका गांधींकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्याचाही विचार पक्षातून पुढे आल्याचे समजते. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंब हा सर्वांना जोडणारा घटक असल्यामुळे राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष व्हावे किंवा ते तयार होईपर्यंत सोनिया गांधींनी अध्यक्षपदी राहावे, असा एका गटाचा आग्रह आहे.
राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाली होती. यानंतर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आता काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याची समोर आलं. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशा नावं चर्चेत आहेत जी गांधी कुटुंबाच्या विश्वासातील आहेत आणि काँग्रेसच्या विचारांची आहेत. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत ही तीन नावं पुढे आली आहेत.
अशोक गेहलोत राज्य सोडून दिल्लीत जाण्यास तयार नसल्याने सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा रंगते. आता एका गटाकडून सुशीलकुमार शिंदे यांचं नाव पुढे आलं आहे. परंतु शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कोणता निर्णय होणार? अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर होणार का? गांधी कुटुंबातील की गांधी कुटुंबाखेरीज व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार हे पाहणं उत्सुकचे असेल.
* राहुल गांधींचा नकार कायम
गांधी कुटुंबाच्या विश्वासातील व्यक्तीकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपवून अप्रत्यक्षपणे पक्षाची सूत्रे गांधी कुटुंबाकडेच ठेवण्याची सूचना निष्ठावंतांकडून आल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी स्वतःच्या आणि प्रियांका गांधींच्या नावाचा इन्कार केला असला तरी, कार्यकारी अध्यक्षपदाबद्दल त्यांनी काहीही भूमिका जाहीर केलेली नाही. शिवाय, नाराज नेत्यांशी संवादाची सुरुवात करण्यात प्रियांका गांधींनी घेतलेला पुढाकार पाहता या कार्यकारी अध्यक्षपदासाठी प्रियांका यांचे नावही पुढे येऊ शकते. तर, सुशीलकुमार शिंदे यांचे नाव संभाव्य अध्यक्षपदासाठी पुढे येऊ शकते, असे कळते.