मोहोळ : पत्नीच्या खुनामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने जेलमध्येच शर्टच्या बाहीच्या साह्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास उपचारासाठी सोलापूर सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मोहोळ पोलीस स्टेशनमधील जेलमध्येच ही घटना घडली. गुरूदत्त रामचंद्र चौगुले (वय-३९, रा.मुंढेवाडी ता.मोहोळ) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथील
गुरूदत्त रामचंद्र चौगुले (वय-३९) हा आरोपी १५ जून रोजी पत्नीच्या खुनात अटक झाला व सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आरोपी हा सब जेलमधील खिडकीचे लोखंडी गजास त्याचे शर्टची एक बाही गजास व दुसरी बाही स्वःताचे गळ्यात अडकवून काल शुक्रवारी पहाटे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याचे सोबत असलेले इतर आरोपी झोपले होते. यावेळी मोहोळ पेालीस ठाण्याकडील कर्तव्यावर सतर्क असलेले पोलीस शिपाई लक्ष्मण गायकवाड यांचे आरोपीचे हालचाल संशयित असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ इतर आरोपीस जागे करून गळफास घेणारे आरोपीस धरण्यास सांगितले. त्यावरून त्यास इतर आरोपींनी तात्काळ धरले. त्यामुळे त्याचा जिव वाचला. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी लागलीच सबजेलला भेट दिली व जेलमधील आरोपीची विचारपुस केली.
आरोपीने पत्नीचा खून केल्याचा पश्चाताप झाल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झाल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.