सोलापूर : कोरोना संकटाच्या काळात आमदार सुभाष देशमुख यांनी दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा सण मोठा साजरा न करता अनोख्या पद्धतीने साजरा केला. या काळात संपूर्ण शहरवासियांचे रक्षण करणार्या महिला पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांना स्वतः राखी बांधत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
महापौरांसह अन्नपूर्णा योजनाच्या कर्मचार्यांनी आमदार देशमुख यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.
दरवर्षी आ. सुभाष देशमुख रक्षाबंधन सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. संपूर्ण मतदारसंघातील शेकडो भगिनी आ. देशमुख यांना राखी बांधण्यासाठी येतात. मात्र यंदा कोराना महामारीचे संकट असल्याने आ. देशमुख यांनी सर्वांना दूरध्वनीवरून सणाच्या शुभेच्छा दिल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आ. देशमुख यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या घरीही जात राखी बांधून घेतली. तर विकासनगर येथील त्यांच्या कार्यालयात महिला कर्मचार्यांनी आ. देशमुख यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.
“यंदा कोरोनाचे संकट असल्याने रक्षाबंधन सण साजरा करता आला नाही. रक्षाबंधनादिवशी भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहिण भावाला राखी बांधते. मात्र सध्या कोरोनाच्या काळात संपूर्ण सोलापूरवासियांचे रक्षण महिला पोलिस उपायुक्त डॉ. कडूकर करत आहेत. त्यामुळे त्यांना राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली”
– सुभाष देशमुख, आमदार