मुंबई : कोरोना काळात रिलायन्सच्या शेअरच्या किमतीत मोठी तेजी आली आहे. आता रिलायन्सबद्दल एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यात रिलायन्स कंपनी आणि त्याचे चेअरमन मुकेश अंबानी सातत्याने चर्चेत येत आहेत.
रिलायन्स इटस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय आणि कंपनीमध्ये एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर असलेले पीएमएस प्रसाद यांनी त्याच्याकडील रिलायन्सचे ९० टक्के शेअर गहाण ठेवून १०३ कोटीचे कर्ज घेतले आहेत. प्रसाद २१ ऑगस्ट २००९ पासून रिलायन्सचे पूर्ण वेळ संचालक आहेत. ते गेल्या ३८ वर्षांपासून रिलायन्ससोबत काम करत असून अनेक वरिष्ठ पदावर काम करत आहेत. एखादा प्रमोटर त्याच्याकडील शेअर तेव्हाच गहाण ठेवतो जेव्हा त्याला पैशांची गरज असते. हे पैसे कर्ज फेडण्यासाठी अथवा कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी असू शकते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सच्या संचालक मंडळात समावेश असलेल्या पीएमएस प्रसाद यांनी २९ जून रोजी रिलायन्सचे ६ लाख शेअर गहाण ठेवलेत. याची किमती १०३ कोटी इतकी आहे. गहाण ठेवलेल्या शेअरचे प्रमाण प्रसाद यांच्याकडे असलेल्या एकूण शेअरच्या ९३.७५ टक्के इतके आहे. प्रसाद यांच्याकडे रिलायन्सचे एकूण ६.४० लाख शेअर आहेत. २०१९-२० या काळात त्यांना ११.१५ कोटी रुपये इतके वार्षिक वेतन मिळाले होते. तर त्याआधीच्या वर्षी १०.०१ कोटी इतके पॅकेज मिळाले.