भोपाळ : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांना अयोध्यामध्ये पार पडणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सरयू तटावर उपस्थित राहतील आणि कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर प्रभू रामाचे दर्शन घेतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मै भोपाल से आज रवाना होऊंगी । कल शाम अयोध्या पहुँचने तक मेरी किसी संक्रमित व्यक्ति से मुलाकात हो सकती हैं ऐसी स्थिति में जहाँ @narendramodi और सेकडो लोग उपस्थित हो मै उस स्थान से दूरी रखूँगी ।तथा @narendramodi और सभी समूह के चले जाने के बाद ही मै रामलला के दर्शन करने पहुँचूँगी।
आज सोमवारी सकाळी उमा भारती यांनी अनेक ट्वीट्स केली आहेत. कालपासून मी अमित शहा आणि अन्य भाजप नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले आहे, तेव्हापासून मी अयोध्येतील मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटत आहे. म्हणूनच मी रामजन्मभूमी भूमिपूजनाच्या स्थळी न येता शरयू नदीच्या काठावर उपस्थित राहू, असे न्यासाच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. भूमिपूजनस्थळी उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांच्या यादीतील आपले नाव रद्द करण्याची विनंतीही यावेळी त्यांनी केली आहे.
उमा भारती यांनी सांगितले की, मी राम जन्मभूमी न्यासच्या अधिकाऱ्यांना सुचना दिली आहे की कार्यक्रमाच्या मुहूर्तावर अयोध्याच्या सरयू नदीच्या किनारी उपस्थित राहील. अयोध्यामध्ये एखाद्या संक्रमित व्यक्तीशी भेट होऊ शकते, अशा स्थितीमध्ये तेथे पंतप्रधान मोदी आणि अन्य शेकडो लोक उपस्थित असतील.