सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयातील एका युवा डॉक्टराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.
चैतन्य अरूण धायफुले (वय 24, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. चैतन्यने एमबीबीएस डिग्री मिळवली होती. गेल्या चार महिन्यांपासून तो कोरोना वॉर्डात काम करीत होता. सोमवारी रात्री तो हॉस्टेलवर आला होता. त्याने पहाटे हॉस्टेलमधील खोलीत स्लॅबच्या लोखंडी फॕनला नायलॉनच्या दोरीने फास घेत आत्महत्या केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सायंकाळी त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. चैतन्यचा जास्त मित्रांबरोबर संपर्क नव्हता, अशी माहिती मिळाली आहे. सोमवारी त्याने आपल्या भावंडासमवेत रक्षाबंधन सण साजरा केला होता. हे त्याचे शेवटचे रक्षाबंधन ठरले. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नाही. चैतन्यच्या पश्चात दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.