माढा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माढा येथील निखिल अनंत कांबळे (माढेकर) यांनी 744 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादन केल्याने माढा व सोलापूर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निखिल अनंत कांबळे (माढेकर) यांचे प्राथमिक शिक्षण ए.डी.जोशी सोलापूर, माध्यमिक शिक्षण ए.डी जोशी ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे तर इंजिनिअरिंगचे शिक्षण गव्हर्मेंट कॉलेज पुणे येथे झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर गेली दोन वर्षापासून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. कष्ट जिद्द व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. वडील अनंंत कांबळे न्यू इंडिया इन्शुरन्स शिवाजीनगर पुणे येथे ॲडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. वडील शासकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने घरात शैक्षणिक वातावरण मिळाले. मूळचे माढ्याचे रहिवासी असणा-या निखिलचे आजोबा संभाजी कांबळे यांचा तो नातू आहे