अयोध्या : अयोध्यामध्ये राम मंदिर उभारण्याची देशवासियांची 492 वर्षांची प्रतिक्षा आज (बुधवार) संपणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करुन राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. नरेंद्र मोदी साकेत महाविद्यालयाच्या ग्राउंडवर विमानातून उतरली. त्यानंतर ते थेट हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतील. हनुमानाचे आशिर्वाद घेतल्यानंतर ते बहुप्रतीक्षित राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी रवाना होती. या परिसरात मोदी वृक्षारोपणही करण्याचा कार्यक्रम नियोजित आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती कार्यक्रमस्थळी दाखल तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही अयोध्येत दाखल झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनेक दशाकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत आज बुधवारी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या बहुप्रतिक्षित सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने अयोध्येतील सुरक्षा कडक केली असून जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली आहे.
भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण अयोध्या रोषणाईने उजळून गेली होती. तसेच शरयूचा काठही सजवण्यात आला आहे. पंतप्रधान आज सर्वप्रथम हनुमानगढीत पोहोचतील. ते रामभक्त हनुमानाचे दर्शन घेतील. हनुमानगढीतर्फे पंतप्रधानांना मुकुट तसेच गदा भेट देण्यात येईल.
पंतप्रधानांचे फेटा तसेच चांदीचा मुकुट घालून स्वागत केले जाईल. हनुमंताच्या आशीर्वाद स्वरूपात त्यांना चांदीची गदी भेटस्वरूपात देण्यात येईल, अशी माहिती हनुमानगढीचे मुख्य पुजारी प्रेमदासजी महाराज यांनी दिली. हनुमानगढीत पूजा केल्यानंतर पंतप्रधान श्रीराम जन्मभूमी परिसरात होणार्या भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना होतील.