सोलापूर : सावकारीचा व्यवसाय करणार्या विडी घरकूल येथील दोघा महिलांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविता रमेश सरवदे (रा. अंबिकानगर, जुना विडी घरकुल) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. सविता सरवदे ही लोकांकडून कोरे चेक व कोरे बॉन्ड घेऊन व्याजाने पैसे देणे व सावकारीचा व्यवसाय करत होती. सविताकडून कोरे चेक, अनेक शाखेचे बँक पासबुक व कोरे स्टॅम्प मिळून आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विवेकानंद बाबुराव स्वामी (वय 53 रा. नागेंद्र नगर भाग 1, कुमठा नाका) यांनी सविता सरवदे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर दुसर्या गुन्ह्यात सविता बगले (रा. विडी घरकूल, प्लॅटिनम अपार्टमेंट, हैदराबाद रोड) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सविताकडे कुमार ढंगापुरे, अंबादास मादगुंडी यांच्या नावावे स्टँप, शिवानंद म्हेत्रे यांच्या नावाचा 60 हजारांचा पे चेक सापडला. तिच्याकडून चेक आणि स्टँप जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पांडुरंग धोंडिबा लिंबोळे (वय 55 रा. रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. तपास. पो.स.ई. बुरकुटे करत आहेत.