पुणे : कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमधील संस्थांसोबत पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या मदतीने काम करते आहे. ही लस भारतात 225 ते 250 रुपयांत मिळू शकेल, अशी माहिती ‘सीरम’ने पत्रकातून दिली आहे. या कोरोनाच्या वैश्विक महामारीत सीरम सर्वसामान्यांना परवडेल आशी लस तयार करत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लस सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर सर्व जगात गरिबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूट काम करते आहे. सीरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत काम करत आहे.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लसीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत निधी सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सीरम इन्स्टिट्यूट 2021 पर्यंत 100 दशलक्ष डोज पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स (साधारण 225 ते 250 रुपये) असेल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
सर्वांच्या नजरा कोरोना लसीचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांकडे लागले आहे. याच दृष्टीने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने एक पाऊल टाकले असून उद्योजक बिल गेट्स यांच्या बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन व GAVI सोबत महत्वाचा करार केला आहे. या करारांतर्गत 10 कोटी कोरोना डोसची निर्मिती केली जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आणि सीईओ अदार पुनावाला यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. सिरम इन्स्टिट्युटने ऑक्सफर्ड AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह करार केला आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली असून नुकतीच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाली आहे.
या लसीची जास्तीत जास्त किंमत 3 यूएस डॉलर्स म्हणजे साधारण 225 ते 250 रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला कोरोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल.
* बिल गेट्स यांच्या मदतीने दहा कोटी डोस
यासाठी बिल गेट्स फाउंडेशन जवळपास 150 मिलियन डॉलरचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सिरम इन्स्टिट्युटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत जवळपास 10 कोटी डोस पुरवणार आहे. या लसीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असणार आहे. कोरोना लसीचे 10 कोटी डोज तयार करण्यासाठी बिल गेट्स, गेट्स फाउंडेशन आणि GAVI यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली असून यासाठी त्यांचे आभार, असे ट्विट अदार पुनावाला यांनी केले आहे.