मोहोळ : मोहोळ नगरपरिषद हद्दीतील रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालये, दिवाबत्ती आदी मूलभूत सोयी सुविधा देण्याबाबत नगरपरिषदेला वारंवार अर्ज, विनंत्या करूनदेखील नगरपरिषदेचे सत्ताधारी व प्रशासन याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने नगरपरिषदेच्या अंध, मुक्या आणि बहिऱ्या भूमिकेविरुद्ध मोहोळ भाजपाच्यावतीने आंदोलन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तालुका अध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली “हाक ना बोंब” आंदोलन करण्यात आले. यावेळी मोहोळ नगरपरिषदेच्या छ. शिवाजी महाराज चौक ते गवत्या मारुती चौक दरम्यान मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्यांना “महामिलीभगत खड्डा” असे नामकरण करुन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात “सावधान, येथे महामिलीभगत खड्डा आहे” असे लिहून लाकडी बोर्ड लावण्यात आले. यावेळी “येथे महा मिलीभगत खड्डा आहे, जनतेने सावधानतेने योग्य ती काळजी घ्या हो” नगरपरिषदेच्या नावानं…. चांगभले, सत्ताधार्यांच्या नावानं चांगभले, महा मिलीभगत च्या नावानं चांगभले..” अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
या आंदोलनात संजीव खिलारे, रामचंद्र खांडेकर, मोहोळ शहराध्यक्ष सुरेश राऊत, किसान सेल ता. अध्यक्ष तानाजी दळवे, ओबीसी सेल ता. अध्यक्ष महेश चेंडगे, मदन लाळे सर्, रामदास झेंडगे, प्रभू दळवे, रंगनाथ गुरव, भारत आवारे, बुराण रेनापुर, सुभाष काळे, बाबासाहेब भोसले, विठ्ठल माने, अमोल भोसले, गणेश चव्हाण, श्रीकांत गायकवाड, यशवंत गावडे, गुलाबराव देशमुख, प्रवीण आठवले, दयानंद आठवले, सुरेश राऊत, गणेश काळे, अमोल माने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.