मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू घटनेमध्ये मनी लाँड्रिग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशीसाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. आज शुक्रवारी रिया चक्रवर्तीला ईडी समोर हजर झाली आहे.
रियाने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंतची वेळ मागितली होती. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) रियाची मागणी फेटाळून लावली आहे आणि तिला आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या आदेशाप्रमाणे रिया चक्रवर्ती ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये दाखल झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ईडी कार्यालया हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात समन्सचा अपमान केल्याची केस करण्यात येईल, असं ईडीने स्पष्टपणे सांगितलं. ज्यामुळे रियाला आज ईडी कार्यालयात बोलवल्याप्रमाणे हजर राहावं लागलं. सोशल मिडियावर याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने देखील ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
सुशांत प्रकरणाचा तपास पहिले मुंबई पोलीस करत होते. मात्र सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये रियाविरोधात एफआयआर दाखल केली आणि मग या तपासात बिहार पोलीस सामील झाले. एफआयआरमध्ये रिया आणि तिच्या कुटुंबियांवर अनेक आरोप केले गेले आहेत. ज्यामध्ये रियाने सुशांतच्या पैश्यांची अफरातफर केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडी याचा तपास करत आहे. तर दुसरीकडे सीबीआयने रियासोबतंच आणखी ६ जणांविरोधात तपास सुरु केला आहे.