पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी करोना संसर्गाचे २,९५५ नवीन रुग्ण आढळल्याने सुमारे चार महिन्यानंतर रुग्णसंख्येने एक लाखांचा आकडा ओलांडला आहे. शहरातील चाचण्यांनीही तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात एका दिवसात १,१९६ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे.
पुणे विभागातील ८७ हजार ७३६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार २९४ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ४० हजार १५५ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ३ हजार ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ६६.८२ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
शहर आणि जिह्यातील रुग्णसंख्या एक लाख २६४वर पोहचली आहे. पैकी ७०,९०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये पुण्यातील ४३,६०६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात १६,९७५ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. शहरातील गंभीर रुग्णांची संख्या ६७४ असून, ४३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अतिदक्षता विभागात २४९ रुग्ण उपचार घेत आहेत. २,२७७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी ५९ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २,२९० वर पोहचली आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार ११६ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील तीन लाख २,९४५ चाचण्यांचा समावेश आहे. गुरुवारी ५,२०८ चाचण्या घेण्यात आल्या.