सोलापूर : सोलापूर शहरात आज सोमवारी आलेल्या कोरोनाचे 38 रुग्ण आढळून आले आहेत. तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 130 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 98 पुरूष आणि 32 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 460 झाली असून त्यामध्ये पुरुष 3 हजार 172 तर महिला 2 हजार 288 रुग्णांचा समावेश आहे. आज सिव्हिलमधील 2 मार्कंडेय रुग्णालयातील एक अशा तीन जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 383 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 254 तर महिला 129 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 480 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 442 अहवाल निगेटिव्ह तर 38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 39 हजार 224 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 33 हजार 686 आहे. तर 5 हजार 460 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 12 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 65 आहे.