मुंबई:- सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूनंतर हिंदी सिनेसृष्टीतील राजकारण आणि बाहेरून आलेल्या कलाकारांची गळचेपी प्रेक्षकांसमोर आली व सगळीकडे सलमान खान, करण जोहर, महेश भट्ट यांना टार्गेट करण्यात आलं.हिंदीसिनेसृष्टीला घराणेशाही ची फार मोठी परंपरा आहे ज्याने कित्येक चांगल्या कलाकारांना संधी मिळत नाही व त्यांना हे काम सोडुन द्यावे लागते. सुशांतसिंग राजपुतच्या मृत्युनंतर त्याच्या चाहत्यांनी या घराणेशाही चा जोरदार विरोध केला आणि सुशांतच्या चित्रपट दिल बेचारा ने सारे रेकॉर्ड मोडले. पहिल्यांदाच सिनेसृष्टीत असा प्रकार घडला की एखाद्या कलाकाराच्या मृत्यूनंतर त्याला इतकी पसंती मिळाली.
एम.एस धोनी, काय पो चे,
छिछोरे,केदारनाथ यालाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
चित्रपट येणं आणि तो आवडणं या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबुन आहेत काही काही बॅनर असे आहेत ज्यांनी सिनेसृष्टीत इतिहास घडवला.
भारतात हिंदीसिनेसृष्टीतील यशराज,वाय आर एफ,टी सिरीज चे चित्रपट
आर्थिकदृष्ट्या उजवे ठरतात, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बाहुबली सिनेमांनी प्रेक्षकांना दोन भागात सिनेमा पहाण्यासाठी भाग पाडले.
राजकुमार हिरानीचे चित्रपट हे कायम वास्तविकता दर्शवतात तर कधी कधी वादग्रस्त ठरतात.
इंग्रजी चित्रपटांमध्ये मार्व्हल अवेंजर्स,टर्मिनेटर,अवतार यांची वाट बघत असतात आणि या चित्रपटानी कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
सध्या वेबसिरीज चा काळ असल्याकारणाने चित्रपटांपेक्षाही अधिक पसंती मिळाली यात ही बऱ्याच सिनेकलाकारांनी काम केले आहे.
सुशांत ने बॅकग्राऊंड डान्सर म्हणुन सुरुवात केली आणि अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे,अतिशय संघर्षमय प्रवासातून त्याने आपले करीअर उभे केले होते,सुशांतच्या प्रकरणातुन जे खळबळजनक खुलासे समोर आले
आणि आताप्रकरण निवळले म्हणुन महेश भट्ट यांनी आपल्या नवीन चित्रपट सडक 2 चा ट्रेलर रिˈलीज केला आणि त्याला प्रेक्षकांनी धडक मारली अवघ्या आठ तासात 1लाख 34 हजार लोकांना हा ट्रेलर आवडला तर तब्बल 21 लाख लोकांनी याला नापसंत केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा चित्रपट किती चालेल यात शंकाच आहे.
याआधी सडक(1991) ह्या सिनेमात संजय दत्त, पुजा भट्ट, सदाशिव अमरापूरकर, दीपक तीजोरी यांनी काम केले आहे.