सोलापूर : कर्जाची रक्कम फेडूनही आणखी दोन लाखांसाठी तगादा लावत एकाचे अपहरण केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. एक अटकेत तर दोघे फरार झाले आहेत. प्रकाश घोडके (रा. गडदर्शन सोसायटी, दमाणी नगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे तर त्याचे वडील सदाशिव आणि भाऊ गोपीनाथ हे फरार झाले आहेत.
याबाबत शितल सुरेश वाईकर (वय ४१. रा. मुरारजी पेठ) याने फिर्याद दिली होती. शितलसह तिघांनी सावकारीचा धंदा करणार्या घोडके बापलेकांकडून सुमारे दहा लाख 7 टक्के व्याजाने घेतले होते. यातील 9 लाख रूपये आणि दोन एकर जमिन देऊनही उर्वरित पैशासाठी ते शितलला त्रास देत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासाठी त्याचे अपहरणही केले होते. या त्रासामुळे शितल वाईकर याने पोलिसात घोडके बापलेकांविरूद्ध तक्रार दिली होती. दरम्यान, बुधवारी फौजदार चावडी पोलिसांनी प्रकाश घोडके यास अटक केली असून त्याचे वडील आणि मोठा भाऊ गोपीनाथ फरार झाले आहेत. दरम्यान, घोडके परिवाराची पंढरपूर, तिर्हे येथे मोठी शेती असल्याचे कळते. याशिवाय प्रकाश याचे काका पोलिस असल्याची माहिती समोर आली आहे.
* दोघांना लवकरच अटक करू
याप्रकरणी प्रकाश घोडके याला मरिआई चौकातून अटक केली असून त्याचे वडील आणि भावालाही लवकरच अटक करू, असे फौजदार चावडीचे स.पो.नि. सोमनाथ देशमाने यांनी सांगितले.