मुंबई : आयपीएलमध्ये आपल्याला संधी मिळेल, असे मुंबईच्या एका युवा क्रिकेटपटूला वाटत होते. पण यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे युवा क्रिकेटपटूने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मुंबईत घडली.
करण तिवारी असे आत्महत्या केलेल्या युवा क्रिकेटपटूचे नाव आहे. निराश झालेल्या युवा क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याचे मुंबईच्या पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे. मुंबईमधील कुरार पोलिस स्टेशनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यामुळे मुंबईचा युवा क्रिकेटपटू करण तिवारी हा निराश झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
करणने ही गोष्ट उदयपूर येथे राहणाऱ्या आपल्या सर्वात जवळच्या मित्राला फोन करून सांगितली. त्याचबरोबर आपण निराश झाल्यामुळे आत्महत्या करायला जात आहोत, असेही त्याने आपल्या मित्राला सांगितले. त्यानंतर या मित्राने त्याच्याच शहरात राहणाऱ्या करणच्या बहिणीला फोन करून ही माहिती दिली.
करणच्या बहिणीने त्याच्या आईला ही गोष्ट त्वरीत सांगितली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण तोपर्यंत आपल्या रुमचा दरवाजा बंद करून करणनने आत्महत्या केली होती. त्यानंतर करणला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. करणसोबत त्याची आई आणि भाऊ राहत होता. गेल्या काही वर्षांपासून करण तिवारी संधीची वाट पाहत होता, असे त्याचा मित्र आणि अभिनेता जितू वर्मा याने सांगितले. मुंबईच्या सिनिअर संघाचे कोच विनायक सामंत यांनी सांगितले की, त्यासाठी चांगला क्रिकेट क्लब आम्ही शोधत होतो.
* आयपीएलचे आकर्षण आणि निराशा
आयपीएलमध्ये खेळलो की आपण प्रसिद्ध होतो आणि त्यानंतर बऱ्याच संधी आपल्याला मिळतात, असा युवा क्रिकेटपटूंचा ग्रह आहे. त्यामुळे काहीही करून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी आपल्याला लवकर मिळायला हवी, यासाठी युवा खेळाडू प्रयत्नशील असतात. पण आयपीएल सोडल्यास अन्य क्रिकेटचा ते जास्त विचार करत नाहीत. त्यामुळे आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही तर क्रिकेटपटू निराश होतात.