मुंबई : भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावं. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते दाखवणार नाहीत. कारण आपल्याला मुख्यमंत्री विचारणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच ते भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा केविलवाणा स्टंट करीत आहेत,” असं म्हणत भाजपा नेते आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमातून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे. याउलट महाविकास आघाडी सरकारने राज्यात एका कवडीचेही पॅकेज गोरगरिबांना दिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा खरंच कळवळा असेल तर काँग्रेस नेत्यांनी भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून गरिबांसाठी पॅकेज जाहीर करायला भाग पाडावे. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते दाखविणार नाहीत. कारण आपल्याला मुख्यमंत्री विचारणार नाहीत, आघाडी सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही, हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच ते भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा केविलवाणा स्टंट करीत आहेत, असे उपाध्ये म्हणाले.
* केंद्राने हे केल्याचा दावा
केंद्राने लॉकडाउनच्या काळात राज्यातील शेतमालाची केलेली खरेदी व पीक विम्याची रक्कम विचारात घेतली तर महाराष्ट्राला ९ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कापूस, तूर, तांदूळ, मका यांसारख्या पिकांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने ८ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. मुद्रा योजनेतून कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांचे दोन महिन्यांचे व्याज केंद्र भरले आहे. यातून महाराष्ट्रातील हजारो छोट्या उद्योजकांचा १०० कोटींचा लाभ होणार आहे,” असंही उपाध्ये यांनी स्पष्ट केलं.