पुणे : आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिश्कील टोला लगावला. स्वातंत्र्यदिनी राज्यपालांच्या हस्ते पुण्यात शासकीय ध्वजारोहण झाले. पार्थ पवार प्रकरणानंतर अशा काही घडमोडी घडत आहेत की, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत.
पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्यपालांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या वेळी अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ चांगलीच गाजली होती. राज्यपालांनी दोनदा उपमुख्यमंत्र्यांची शपथ एकमेव व्यक्ती अजित पवार यांना चांगले लक्षात ठेवले आहे. त्यावेळी शपथ देणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्याशी अजित पवार यांचे खास सूर जुळले आहेत. त्यामुळे ही शाब्दिक टोलेबाजी रंगली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ध्वजारोहण संपल्यावर राज्यपाल आणि अजित पवार यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी “दादा, आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये” असा मिश्कील डायलॉग राज्यपालांनी ऐकवला. त्यावर मास्कमधूनच दोन्ही हात जोडूध अजित पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांना दंडवत घातला.
दरम्यान, पुण्यात कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.