सांगली : केंद्र सरकारच्या क्लस्टरमध्ये सांगली, नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाचा समावेश आहे. द्राक्षाच्या धर्तीवर यंदा सांगली जिल्ह्याचा बेदाणा क्लस्टर म्हणून ओळख निर्माण होणार आहे. केंद्र सरकारचे धोरणांतर्गत ऍपेडा आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे ( मांजरी) यांच्या पुढाकारांचे येत्या हंगामापासून बेदाणा निर्यातीसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
द्राक्ष बागांच्या निर्यात नोंदणीच्या वेळीच त्याच सॉप्टवेअरमध्ये शेतकरी आता बेदाण्याची नोंदणी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोरोना संकटात बाजारपेठेच्या शोधात असलेल्या शेतकऱ्यांना एक संधी यामुळे निर्माण होणार आहे. सांगली जिल्ह्यात आणि कर्नाटकातील विजापूरपर्यंत पसरलेले प्रचंड द्राक्षबागेचे क्षेत्र विस्तारलेय.
द्राक्ष उद्योगावर संकटाची मालिका गेल्या वर्षी यामुळे अधिक गडद झाली. लॉकडाऊनने केवळ मार्केटींगचीच नव्हे तर निर्यातीच्या द्राक्षापासूनही बेदाण्याचाच पर्याय नाविलाज म्हणून निवडावा लागला. हे ताजे उदाहरण असल्यामुळे यापुढे बेदाण्याची अधिकाधिक बाजारपेठेचा देशांतर्गत विचार करतानाच निर्यातीवरही भर द्यावाच लागणार आहे.
* एखादी अधिकृत संस्था व्हायला हवी
ऑनलाईन नोंदणी आणि निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतील बेदण्याच्या दरात वाढीला स्थिती पोषक होण्यास मदत होणार आहे. हा निर्णय केवळ सांगली नव्हे तर नाशिकसह, सोलापूर, अहमदनगर, जालना जिल्ह्यात द्राक्षाचा विस्तार सुरु आहे. त्यांनाही याचा फायद्या होईल. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण, सर्व पोषणमूल्ये असलेला बेदाणा तयार व्हायला हवा. आपल्या शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आहे. आज जागतिक बाजारपेठ वाढते आहे. त्या बाजारपेठेत आपला बेदाणा जाण्यासाठी संशोधन व्हायला हवे, उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत बदल व्हायला हवेत. खर्च कमी करण्यासाठी एखादी अधिकृत संस्था व्हायला हवी आहे.