सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील श्री गणपती पंचायतन देवस्थानचा रथोत्सव दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत साजरा होतो. या उत्सवास जवळजवळ अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे रथ उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती विश्वस्त राजेंद्र पटवर्धन आणि डॉ. आदिती पटवर्धन यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तासगावच्या सिद्धिविनायक मंदिराची स्थापना 1779 मध्ये झाल्यापासून श्रींच्या वार्षिक भाद्रपद उत्सवातील ऋषीपंचमीचा रथोत्सव हे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील फार मोठे आकर्षण राहिले आहे. रथ उत्सव सर्वत्र विखुरलेल्या श्री गणेश भक्तांसाठी आपुलकीचे व अत्यंत महत्त्वाचे आकर्षण असते. हा रथोत्सव 23 अॉगस्ट रोजी ऋषीपंचमी दिवशी होणार होता. मात्र कोरोनामुळे रद्द केला आहे.
मात्र यंदाच्या कोरोना च्या राष्ट्रीय आपत्तीमुळे ओढवलेल्या,आणीबाणीच्या परिस्थितीमुळे सदरचा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात तालुका प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत श्री गणपती पंचायतन देवस्थान तासगाव येथील विश्वस्त मंडळाने आपला निर्णय जाहीर केला आहे.मात्र यामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडीत झालेली आहे.