सांगली : कोव्हिड कालावधीमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज अशा हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीमुळे रुग्णांना व प्रशासनाला मोठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
कोव्हिड 19 च्या उपचारासाठी चंदनवाडी, मिरज येथे 50 बेडचे हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व अत्याधुनिक उपचार व रुग्णांच्या सेवेसाठी 200 बेडचे सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदिपसिंह गिल, हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रविंद्र आरळी, व्यवस्थापकीय संचालक प्रसाद जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
या हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग विभाग, सामान्य शस्त्रक्रिया विभाग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरुग्ण विभाग, कान, नाक, घसा, मूत्रशास्त्र विभाग, गॅस्रोताएनटोरोलॉजी विभाग, मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया विभाग, त्वचारोग अशा 20 पेक्षा जास्त आजारांसाठीचे विभाग आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.