नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशमधील मंत्री चेतन चौहान यांचं आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. शिवाय, त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्या नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज रविवारी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी चेतन चौहान यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी चेतन यांना लखनऊच्या पीजीआयमधून मेदांता गुरूग्राममध्ये आणण्यात आले होते. मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही तासांपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा नव्हती. त्यातच त्याची किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दोनवेळा माजी खासदार म्हणून काम केलेले चेतन चौहान हे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. चेतन चौहान हे भारताकडून 40 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी 1970 च्या दशकात सुनील गावसकर यांच्यासह सलामीला येताना चांगल्या धावाही केल्या होत्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही यशस्वी सलामीवीरांच्या जोडींपैकी एक जोडी आहे.
चेतन चौहान यांनी भारतीय संघाच्या व्यवस्थापकाची भूमिकाही सांभाळली होती. भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्याचबरोबर दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले होते.
* चौहान- गावस्कर सलामी जोडी
चेतन चौहान हे सुनील गावस्कर यांच्याबरोबर सलामीला यायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात चेतन चौहान आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती. १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले. गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्येही चेतन चौहान यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आहे. चेतन चौहान डीडीसीएचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य निवडकही होते.