मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगणा राणावतने घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला होता. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये इतरांपेक्षा स्टार किड्सला जास्त संधी देण्यात येते अशी टीकाही तिने केली होती. यापूर्वीही कंगणा तिच्या परखड मतांमुळे चर्चेत होती. दरम्यान पुन्हा राजकारणात एंट्री या मुद्द्यावरून कंगणा चर्चेत आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काही दिवसांपूर्वी कंगणा राणावतने नरेंद्र मोदींचं समर्थन केलं होतं. त्यावेळी तिला सोशल मिडियावरही ट्रोल करण्यात आलं. मात्र या सर्वांना प्रत्युत्तर देताना म्हणाली, ‘की अनेकांना असं वाटतंय की मला राजकारणात यायचं आहे म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत आहे.
यामुळे मला ट्रोल करण्यात आलं. मात्र या सर्वांना मला सांगायचं आहे की, माझे आजोबा 15 वर्ष काँग्रेसचे आमदार होते.’
कंगणाच्या अधिकृत टीमने यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘राजकारणामध्ये माझं घराणं फार नावाजलेलं आहे. गँगस्टर चित्रपटानंतर मला काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली होती. इतकंच नाही तर मणिकर्णिकानंतर मला भाजपकडूनंही तिकीट मिळत होतं. मात्र माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे मी राजकारणात जाण्याचा विचार करत नाही.’
पंतप्रधान मोदींचं समर्थन केल्यानंतर कंगणाला राजकारणात जाण्याची इच्छा आहे अशा अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यासंदर्भात कंगणाला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आलं. मात्र कंगणाने राजकारणात जाण्याची इच्छ नसल्याचं स्पष्ट केलं आहे.