मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवाराचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. पार्थ पवार राजकारणात आहे. तो १८ वर्षाचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवलीय. त्यामुळे तो परिपक्वच आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. तो राजकारणात आहेत. शिवाय त्याने निवडणूकही लढवली आहे. त्यामुळे तो परिपक्व आहेत, असं नारायण राणे म्हणाले. पार्थ यांनी केलेल्या मागणी मागे त्यांचे स्वत:चे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्यांनी हे विधान केलं असेल, असंही राणे म्हणाले.
* संजय राऊतांमुळेच संशय वाढला
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मी कधीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. मीडियानेच त्यांचं नाव घेतलं आहे. सुशांतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने त्यावर निर्णय घ्यावा. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत बोलत आहेत. आदित्यचा याप्रकरणाशी संबंधच नाही तर राऊत का बोलत आहेत?, असा सवाल करतानाच राऊत वारंवार बोलत असल्यानेच या प्रकरणात संशय अधिक वाढला आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.