नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. निवृत्तीची घोषणा धोनीने ही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. धोनीच्या या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला लोकसभा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. पण अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला धोनीने पाठिंबा दर्शविला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर महेंद्रसिंह धोनीला सल्ला देणारे ट्विट भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, एमएस धोनी क्रिकेटमधून निवृत्त होत असून पण दुसर्या कोणत्याही गोष्टींपासून नाही. आव्हानांसोबत लढा देण्याची त्याची प्रतिभा आणि त्याने क्रिकेटमध्ये दाखविलेल्या संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता सार्वजनिक जीवनात आवश्यक असून आगामी लोकसभा निवडणूक त्याने लढवावी, असे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने काल शनिवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
मात्र, धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसत आहे. यातच भाजपकडून धोनीला विशेष ऑफर देण्यात आली आहे. झारखंडमध्ये 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक धोनीने लढवावी, असा सल्ला भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्मामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. धोनीने मात्र यावर आणखी प्रतिक्रिया, उत्तर दिलेले नाही.