सोलापूर : 25 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून 1 लाख 69 हजार 400 रुपयांना दोन अनोळखी इसमांनी तरूणीची फसवणूक केल्याची घटना 10 ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास घोडा तांडा कुमठे (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली.
रेश्मा रवी राठोड (वय-25 रा. घोडा तांडा) यांच्या वॉट्सअपवर दोन अनोळखी इसमांनी मेसेजद्वारे लकी ड्रॉ लागलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. हा मेसेज पाठवलेला व्हाट्सऍप क्रमांक सेव्ह करून रेश्मा यांना व्हॉट्सऍप कॉल करण्यास सांगितले. त्यावेळी राठोड यांनी कॉल केला असता 25 लाखाची लॉटरी लागली असून पैसे खात्यात पाठवण्याकरिता 14 हजार रुपये इतकी सुरुवातीची रक्कम भरावी लागतील असा मेसेज आरोपींनी पाठविला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान रेश्मा यांनी विश्वास ठेवून थोडे थोड करत 1 लाख 69 हजार 400 रुपये एटीएमद्वारे भरले. दरम्यान पैसे देऊनही लॉटरी रक्कम मिळत नसल्याने रेश्मा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत दोन अनोळखी इसमांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल घुगे हे करीत आहेत.