पंढरपूर : पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष व पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आजारातून लवकर बरे व्हावेत यासाठी सुधाकरपंत परिचारक यांचे नातू आणि प्रशांत परिचारक यांचे पुत्र प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार सुधाकरपंत परिचारक यांना उपचारसाठी पुण्यात नेहल्यापासून त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण अस्वस्थ आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कोणी देवाला नवस केले आहेत तर कोणी व्रत उपासना सुरु केले आहेत. पाडुरंग कारखान्याला प्रगती पाथवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. गेल्या पन्नास वर्षापासून ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता, ते ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. असे आवाहन नातू प्रितीश प्रशांत परिचारक यांनी केले आहे. 85 वर्षीय सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
* अशी आहे भावनिक पोस्ट
गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास कोविड विलगीकरण वॉर्डमध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3314420441957715&id=100001693749067
आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर (सुधाकरपंत परिचारक) पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला कोविड न्यूमोनिया यामुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे. गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाईही जिंकतील अशी आशा करुयात. वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.