सोलापूर : आपण वाळू व्यवसायातील भागीदार असून पकडण्यात आलेला वाळूचा टेम्पो सोडण्यास सांगणार्या पोलिस नाईकाला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना दणका देत त्याला निलंबित केले आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे. विकी गायकवाड असे त्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विजापूर नाका पोलिस 3 ऑगस्ट रोजी गर्जना चौक येथे रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांनी (एम.एच.20-ए.2461) आणि (एम.एच.4-एजी.5582) या दोन टेम्पातून बेकायदेशीर होणारी वाळू वाहतूक पकडली. पोलिसांनी चालक रवि निकम (रा. बजरंग नगर), पंकज जाधव (रा. सेटलमेंट) यांना ताब्यात घेतले.
दरम्यान दुसर्या पो.ना. विकी गायकवाड याने विजापूर नाक्याचे पो.नि. हेमंत शेडगे यांच्या दालनात जाऊन आपण वाळू व्यवसायात भागिदार असून ते दोन्ही टेम्पो माझेच आहेत, ते का सोडले नाहीत, तुम्ही पोलिस असून दुसर्या पोलिसाला मदत करत नाही, अशी भाषा करत हुज्जत घातली. ही बाब पो.नि. शेडगे यांनी पोलिस आयुक्त शिंदे यांच्या कानावर घातली आणि त्यांच्या लेखी तक्रार केली. दरम्यान, आयुक्तांनी यावर तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पो.ना. विकी गायकवाड यास निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.