नवी दिल्ली : आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे प्रायोजकत्व विवो कंपनीने सोडल्यानंतर नव्या प्रायोजकाचा शोध बीसीसीआयने सुरू केला होता. अखेर ड्रीम ११ला युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे प्रायोजकत्व मिळाले आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रृजेश पटेल यांनी ही माहिती दिली.
ड्रीम ११ ने आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठीचे प्रायोजकत्व २२२ कोटी रुपयांना मिळवल्याचे पटेल यांनी सांगितले. आयपीएलचे प्रायोजक मिळवण्याच्या स्पर्धेत अनेक भारतीय कंपन्या होत्या. यामध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स, बाबा रामदेव यांची पंताजली यांचा समावेश होता. पण अखेर बाजी मारली ती ड्रीम ११ या कंपनीने.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारत-चीन यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल आणि विवो इंडियाने या वर्षी वेगळ होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर IPLच्या प्रायोजकासाठी इ-कॉमर्समधील आघाडीची अमेझॉन, भारतीय संघाच्या जर्सीचे प्रायोजक असलेले लर्निंग अॅप बायजूज , ड्रीम ११, बायजूजची प्रतिस्पर्धी असलेली Unacademy, MyCircle11 ही एक स्पोर्ट्स फॅटसी प्लॅटफॉम कंपनी यांच्यात स्पर्धा होती. त्यात रिलायन्स आणि रामदेव बाब यांनी देखील उडी घेतली.
विवोच्या माघारीनंतर आता रिप्लेसमेंट म्हणून येणारी कंपनीकडून विवो इतके मूल्य मिळणार हे निश्चित होते. विवो एका वर्षासाठी ४४० कोटी रुपये देत होते. आता येणाऱ्या कंपन्या १८० कोटी पर्यंत रक्कम देईल असा अंदाज होता. आता ड्रीम ११ बीसीसीआयला २२२ कोटी देणार आहे.
ड्रीम ११ ही स्टार्टअप कंपनी तेराव्या आयपीएलची टायटल स्पॉन्सरर आहे. बीसीसीआयने ही घोषणा केली. यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरर होण्याकरिता ड्रीम ११ कंपनी २२२ कोटी रुपये मोजणार आहे. तसेच २०२१ आणि २०२२ मध्ये होणार असलेल्या आयपीएल स्पर्धेत विवो टायटल स्पॉन्सरशिप देणार नसल्यास या दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी २४० कोटी रुपये मोजून ड्रीम ११ कंपनी टायटल स्पॉन्सरर होणार आहे.
* ड्रीम ११ ॲप कंपनी विषयी
आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरर झालेल्या ड्रीम ११ कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. भारतात २००८ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीत ५४२ जण कार्यरत आहेत. कंपनीच्या अॅपचे ८ कोटींपेक्षा जास्त युझर आहेत. आयपीएल सुरू होण्याआधी कंपनीने अॅपची जाहिरात करण्यासाठी स्पर्धेत सहभागी होणार असलेल्या ७ क्रिकेटपटूंशी करार केला आहे. ड्रीम ११ अॅप आणि आयपीएल या दोन्हीच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलची टायटल स्पॉन्सरर होण्याची संधी ड्रीम ११ कंपनीला मिळाली आहे.
हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी ड्रीम ११ ही अॅप बेस्ड स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. यात अॅपमध्ये सामना सुरू होण्याआधी संघात कोण असेल, कोणत्या क्रमांकावर कोण खेळेल अशा स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. जास्तीत जास्त अचूक उत्तर देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल वॉलेटमध्ये बक्षिसाची रक्कम जमा होते. क्रिकेट प्रमाणे ड्रीम ११ अॅपवर कबड्डी, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल या स्पर्धांसाठी उत्तरांच्या स्वरुपात अंदाज वर्तविता येतात.