नवी दिल्ली : जी-मेलची सेवा गेल्या तासाभरापासून बंद आहे. त्यामुळे अनेकांना ई-मेल पाठवण्यात अडचणी येत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दलच्या तक्रारी मांडल्या आहेत. जी-मेलच्या माध्यमातून ई-मेल पाठवण्यात आणि फाईल अटॅच करण्यात समस्या येत आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, जपान आणि जगातील इतर भागांमध्येही जी-मेलची सेवा विस्कळीत झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्या भारतातील अनेक जीमेल (gmail) यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये जीमेल करताना ‘अटॅचमेंट्स’ (attachments) आणि ‘लॉग इन’सह (log in) इतर अडचणी येत असल्याची तक्रार आहे. या समस्या सारख्या येत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. बऱ्याच यूजर्सनी जीमेलमध्ये अटॅचमेंट्स जोडण्यासाठी आणि गुगल ड्रायव्हवर (google drive) फाईल अपलोड करताना अडचणी येत असल्याचं सांगितलंय.
जीमेल आणि गुगल ड्रायव्ह या दोन्ही सेवा गुगलच्या (Google) मालकीच्या आहेत. डाऊन डिटेक्टरच्या (Down Detector) म्हणण्यानुसार, जी-मेल आणि गुगल ड्राईव्हबद्दलच्या अडचणी फक्त भारतातच येत नसून त्या भारत सोडून जगातील इतर काही देशांतही निर्माण झाल्या आहेत.