सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीणमधील आज गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने 281 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 833 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एक हजार 552 अहवाल निगेटिव्ह आले तर 281 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता 8 हजार 661 एवढी झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज महूद (ता. सांगोला) येथील 65 वर्षांचे पुरुष, काळा मारुती मंदिराजवळ पंढरपूर येथील 73 वर्षाचे पुरुष, हरिदास गल्ली पंढरपूर येथील 82 वर्षाची महिला, महाळूंग (ता. माळशिरस) येथील 75 वर्षांचे पुरुष, अरण (ता. माढा) येथील 76 वर्षाचे पुरुष तर अकलूज (ता. माळशिरस) येथील 45 वर्षांच्या महिलेचे कोरोनाने आज बळी घेतला आहे. कोरोनाने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 243 एवढी झाली आहे. अद्यापही दोन हजार 825 जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय पाच हजार 593 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.