मुंबई : हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या यांच्या कुटुंबातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 90 वर्षांचे होते. असलम खान यांना शुगर, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असलम खान यांचे भाऊ एहसास खान हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये भरती आहेत.
काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान आणि अस्लम खान या दोन्ही भावांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अस्लम खान यांचं अखेर निधन झालं आहे. अस्लम खान यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे.
दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खानदेखील करोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. असलम खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे एहसास यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.