कोलकाता : कोझिकोड विमान दुर्घटनेनंतर AAI सतर्क झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोझिकोड विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या बांधकामास मस्जीद अडथळा ठरली आहे. या मस्जीदवरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
देशात सर्वाधिक वापरलं जाणाऱ्या विमानतळांपैकी एक असलेल्या कोलकातास्थित नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुस-या धावपट्टीचे बांधकाम लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. कोलकाता विमानतळावर दुसरी धावपट्टी तयार केल्यानं एका धावपट्टीवर येणाऱ्या विमानांची संख्या कमी करून ती दुसरीकडे वळवता येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याशिवाय कोलकाता विमानतळावर मोठ्या विमानांची संख्या वाढत असल्यानं दुसऱ्या धावपट्टीची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. धावपट्टीवर विमान न थांबल्यानं विमान दरीत कोसळून काही दिवसांपूर्वी मोठा आपघात झाला होता. महाराष्ट्रीय पायलट साठे यांनी अपघात रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र आपघात झालाच, त्यात त्यांना आपल्या जीवासही मुकावे लागले.
दुसरी धावपट्टी तयार करताना सुरक्षेच्या दृष्टीनं काही अंतर ज्यादा सोडणं गरजेचं असतं ज्यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही. मात्र ही धावपट्टी तयार केल्यानंतर पुढे अगदी लागूनच मस्जीद येत असल्यानं अंतर सोडण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे ही मस्जीद स्थलांतरीत करण्याबाबत विमान प्राधिकरणानं प.बंगालच्या सरकारकडे विनंती केली. परंतु सरकारकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याचं AAI चे म्हणणं आहे.
मस्जीद हटवल्यास ही धावपट्टी 800 ते 900 मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. कोझिकोड विमानाच्या दुर्घटनेत मुख्य कारण हेच होतं की धावपट्टीच्या पुढे विमान थांबवण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे धावपट्टीच्या पुढे जाऊन विमान दरीत आदळलं. विमानतळ प्रशासनाने बंगाल सरकारकडे अनेक वेळा मस्जीद हटवण्यासाठी मदत मागितली आहे. मस्जीद हटवण्यासाठी सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही.