सोलापूर : न्यू पाच्छा पेठ येथील कोंची कोरवी गल्ली पोषमा मंदिराजवळील इमारतीमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली असता एका मटकावाल्याने दुमजली इमारतीवरून उडी मारली. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी दुपारच्या सुमारास घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सर्फराज बबलू इनामदार (वय ४२ रा. नई जिंदगी सोलापूर) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोषमा मंदिरजवळील दोन मजली इमारतीमध्ये मटक्याची बुकी सुरू होती. शहरातील लावण्यात आलेल्या मटक्याच्या चिट्या आणि पैशाचे कलेक्शन याचे कामकाज या इमारतीमध्ये चालत होते. हा प्रकार खब-याकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजल्यानंतर दुपारी अचानक धाड टाकली.
पोलीस आल्याचे समजतात आतमधील मटका बुकीवाल्यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना घाबरून सर्फराज इनामदार याने दुस-या मजल्यावरून उडी टाकली. खाली पडल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला.