मुंबई : आयआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक तरुणांचे गुगलसारख्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. परंतु एका तरुणाने रिस्क घेऊन चक्क लाखो रुपयांचे पॅकेज असलेल्या गुगलच्या नोकरीला रामराम ठोकत समोसे – कचोरी विक्रीचा धंदा थाटला आहे. सध्या ह्या धंद्यामधून तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुनाफ कपाडिया असे ह्या मुंबईकर तरुणाचे नाव असून तो गुगलमध्ये अकाऊंट स्टॅटर्जिस्ट या पदावर कार्यरत होता. मसुरी, हैदराबादनंतर सध्या त्याची बदली मुंबईत झाली होती. नोकरी सुरू असताना त्याने टीबीके नावाने ऑनलाईन फूड डिलीव्हरीचा व्यवसाय सुरू केला.
गुगल सारख्या कंपनीत अकाउंट स्ट्रॅटजिस्ट म्हणून काम करणाऱ्या मुनाफचे आयुष्य तसे छान चालले होते. पण नोकरी पेक्षा त्याची इच्छा बिझनेस करण्याची होती. आदी मसूरी, हैदराबाद आणि नंतर मुंबईत पोहोचलेल्या मुनाफने गुगलमधील नोकरी सोडली आणि टीबीके नावाची एक कंपनी सुरू केली. अर्थात तुम्हाला वाटेल की ही कंपनी आयटी किंवा इंटरनेट संदर्भातील सेवा देणारी असेल. पण मुनाफची ही कंपनी काम करत होती डिलिव्हरी किचन या क्षेत्रात. त्याने ऑनलाइन फुड ऑर्डर घेण्यास सुरूवात केली. या किचनमध्ये चव होती ती त्याच्या आईच्या हाताने तयार केलेल्या पदार्थांची होय.
त्याद्वारे त्याने आईच्या मदतीने बोहरी जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचविले. तिथूनच त्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यालादेखील धंद्यात फटका बसला. त्याने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. एकेदिकशी त्याची स्टोरी फोर्ब्ज इंडियाने छापली. त्यामुळे त्याचा आत्मकिश्वास काढला. पुन्हा जोमाने त्याने कामाला सुरुकात केली. या डिलिव्हरी किचनची सुरुवात मुनाफने समोसे आणि कचोरीने केली होती. आता तो मटन समोसे, नरगिस कबाब, डब्बा गोश्त असे पदार्थ तयार करतो. मुनाफचा वर्षाचा नफा ५० लाखच्या पुढे आहे.
* मिळाला टर्निंग पॉईट
व्यवसाय सुरू तर झाला होता. पण व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक अशी ऑर्डर मिळत नव्हती. त्यामुळे एका क्षणी त्याने किचन व्यवसाय बंद करण्याचा विचार केला. त्याच काळात नेमके फोर्ब्स इंडियाकडून त्याला फोन आला. ३० अंडर ३० या विशेष आवृत्तीसाठी त्याची स्टोरी घेतली जाणार होती. या फोनने मुनाफचा उत्साह वाढवा. त्याच्या लक्षात आले की आपल्या पदार्थांची चव फोर्ब्सपर्यंत पोहोचली आहे.
* स्टार लोकांनादेखील आवडली
तुफान नफा आणि कमाई पाहून मुनाफने मागे वळून पाहिले नाही. २०१९ पर्यंत त्याने मुंबईतील अनेक ठिकाणी त्याचे किचन सुरू केले. मुनाफच्या हातची चव फक्त सर्व सामान्य लोकांना नाही तर स्टार लोकांना देखील आवडली आहे. ऋषी कपूर, राणी मुखर्जी, ऋतिक रोशनसह अनेक बॉलिवूड कलाकार त्याच्या डिलिव्हरी किचनमधील पदार्थाची चव चाखली आहे. सध्या करोना व्हायरसमुळे मुनाफचे किचन बंद आहे.