नवी दिल्ली : टाटा ग्रुप ई कॉमर्स सुपर ॲप बाजारात आणून जिओ, ॲमेझॉनला टक्कर देणार आहे. चीनचे सुपर ॲप वेचॅटसारखे टाटाचेही सुपर ॲप असणार आहे. हे ॲप डिसेंबर 2020 पर्यंत लॉच होण्याची शक्यता आहे. या ॲपमध्ये अॉनलाईन शॉपिंगसह टाटा ग्रुप कंज्युमर ड्युरेबल्स, इंश्युरन्स, फायनान्स सर्व्हिस, हेल्थकेअर आणि बिलपेमेंट या सारख्या अनेक सुविधा असणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टाटा ग्रुप ई-कॉमर्स सुपर अॅप बाजारात आणणार आहे. या अॅपमध्ये टाटा समूहाच्या सर्व सेवा असतील. चीनचे सुपर अॅप वेचॅटसारखे टाटाचे सुद्धा सुपर अॅप असणार आहे. त्यामुळे रिलायन्स, अॅमेझॉन टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.
डिसेंबरपर्यंत लाँच होऊ शकते अॅप
टाटा ग्रुपचे हे अॅप 2020 डिसेंबरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सहभाग असणारी टाटा ही देशातील एकमेव कंपनी आहे. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, “हे एक सुपर अॅप असेल ज्यामध्ये अनेक अॅप्स असतील. आमच्यासाठी ही खूप मोठी शक्यता आहे.”
या सर्व सुविधा उपलब्ध होणार टाटा ग्रुपच्या कंपन्यांविषयी सांगायचे म्हटले तर सध्या शॉपिंग अॅप टाटा क्लिक, ग्रोससी आणि ई-स्टोअरसाठी स्टार क्लिक आणि ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म म्हणून क्रोमा हे शॉपिंग अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून टाटा ग्रुप कंज्यूमर ड्यूरेबल्स, इंश्योरन्स, फायनान्स सर्व्हिस, हेल्थकेअर आणि बिल पेमेंट यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.