मोहोळ : मोहोळ नगर परिषदेस वारंवार सांगून ही कचरा उचलला जात नसल्याने मोहोळ शहर शिवसेनेच्या वतीने आज नगर परिषद कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केले.
मोहोळ शहरात कचरा व तुंबलेल्या गटारी, यामुळे सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . त्यात सध्या पावसाळा सुरू आहे. कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. शहरात डासाचा प्रादुर्भावही वाढल आहे. डेंगू सारखे साथीचे आजार होऊ शकतात. यासाठी नगरपरिषदेस वारंवार सांगूनही साफसफाई केली नाही. कचरा उचलला जात नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामुळे नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे व उदासिनतेमुळे मोहोळ शहर शिवसेनेच्या वतीने मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे मोहोळ शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, गणेश क्षिरसागर, राजाभाऊ गुंड, महेश देशमुख, किरण फोफळकर, जयपाल पवार, छोटू हाईगडे, सुलतान इनामदार, ओमर शेख, शाहुराजे बरकडे, प्रफुल कुंभार उपस्थित होते.