नागपूर : नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. यांनी मॉस्क न वापरण्याचा सल्ला दिला होता. मास्क कोणी वापरावे आणि कोणी वापरु नये याची माहिती देत अजिबात मास्क वापरु नका, असे म्हटल्याने चर्चेत आले होते.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. याच पाश्वभूमीवर तुकाराम मुंढे हे सतत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत होते. सणांच्या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे आणि लोकांनी कमीत कमी बाहेर पडावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत होते. त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काही दिवसांपूर्वी नागपूरचे महापौर संदीप जोशीही गृह विलगीकरणात गेले होते. आता खुद्द आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे नागपुरातील लोकांना अधिक सतर्क राहून गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
* काय म्हटलंय ट्वीटमध्ये
“माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मला सध्या कुठलेही लक्षणं नाहीत. त्यामुळे मी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचे सर्व नियम मी पाळतो आहे. गेल्या १४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कृपया टेस्ट करून घ्यावी. आपण नक्की जिंकू”. असं ट्विट त्यांनी केलंय.