पुणे : पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण भरले असून, धरणाच्या सांडव्यातून २ हजार २०० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तरी पाणी कपातीचा निर्णय महानगर पालिका मागे घेते का, या निर्णयाची जनता वाट पाहत आहेत.
पवना धरण पाणलोट क्षेत्रात मगाील २४ तासात ८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात महिनाभरापासून समाधानकारक पाऊस झाला असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस कमीच मानला जात आहे. यावर्षी १ जून ते ३०ऑगस्ट पर्यंत १ हजार ५४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३ हजार १५४ मिलिमीटर पावसाची नोंद होती. या आकडेवारीवरून यावर्षीचा मावळ परिसरातील पाऊस फारच कमी असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात धरणाच्या पाणी साठ्यात ३.५६ टक्के वाढ झाली आहे. तर १ जून पासून आजतागायत ६२.७१ टक्के धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यातील गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच धरण जवळपास ओव्हर फ्लो झाले असून नदी पात्रात २ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडकरांना गतवर्षी पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे.