टेंभुर्णी : पुणे जिल्हा परिसरासह भीमा खो-यात मागील चार दिवसापूर्वी कमी झालेल्या पावसाने कालपासून परत पावसाने सुरुवाता केली. यामुळे उजनी धरणाचे वरील बहुतांशी धरणाचा पाणीसाठा १०० टक्के झाला आहे. लवकरच उजनीही शंभरी गाठणार आहे. यामुळे शहर – जिल्ह्यासह बळीराजा सुखावला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला ९४१६, पवना २१६०, मुळशी १०३०० क्युसेक्सने या धरणांसह अनेक धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे उजनीत येणारा विसर्ग दौंड – २४३४८ क्युसेक बंडगार्डन – १९७१९ क्युसेकने पाणी मिसळू लागल्याने उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पाणीसाठा ९६.२६ टक्के म्हणजेच ११५.२४ टी.एम.सी इतका झाला आहे. असाच विसर्ग सुरु राहिला तर येत्या २४ तासात १०० टक्के भरणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील वर्षी १ आॉगस्टला भरलेले उजनी चालू वर्षी पुण्यासह भिमाखो-यात पावसाने ओढ दिल्याने उजनीची टक्केवारी ११.३८ इतकीच होती. वरील धरणांचाही पाणीसाठा समाधानकारक नव्हता. यामुळे चालू वर्षी धरण शंभरी गाठणार की नाही काळजीत असलेल्या शेतक-याला चालू महिन्यात पावसाने भीमा खो-यासह पुणे परिसरात हजेरी लावल्याने ब-याच धरणांनी शंभरी गाठली आहे. यामुळे धरणातून सोडलेला विसर्ग दौंडमधून उजनीच्या पाणीसाठ्यात उजनीत येणारा विसर्ग
दौंड – २४३४८ क्युसेक
बंडगार्डन – १९७१९ क्युसेक्सने जमा होत आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीसाठा वाढू लागला आहे.
आज रविवारी सायंकाळी सहा वाजता ९५.६१ टक्के इतका झाला आहे. धरणातून सीना माढा बोगदा – २०० क्युसेक्स सीना माढा उपसा – २६२ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. येत्या पावसाची संततधार कायम राहिली तर उजनी येत्या तीन चार दिवासात पूर्ण क्षमतेने १११ टक्के भरण्याची शक्यता आहे.
* भीमा खो-यातील धरण पाणीसाठा व सोडलेला विसर्ग ३० अॉगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंतची माहिती
टक्केवारी सोडलेला विसर्ग
खडकवासला – १००% ९४१६
पानसेत – १००% १९८०
वरसगाव – १००% २६६५
मुळशी – १००% १०३००
कासारसाई – १००% ४००
पवना – ९८.३१ २१६०
आंद्रा – १००% ९४७
चासकमान – १००% ९२५
कळमोडी – १००% ४७१
घोड – ९३.३३ ३१००
डिंभे – ९७.३१ ४१२०
वडज – ९६.६४ ४००
चिलेवाडी – ७८.४८ १४४८
गुंजवणी – ९९.३८ ७३८
भाटघर – १०० ४९००
वीर – १०० १४५११
नाझरे – १०० २३०
येडगाव – ८८.९९ विसर्ग नाही
माणिकडोह – ४०.३४ विसर्ग नाही
पिंपळगाव जोगे –३६.०७ विसर्ग नाही
निरा देवधर – १०० विसर्ग नाही
विसापूर – ५५.११ विसर्ग नाही
भामा आसाखेड – ८८.७२ विसर्ग नाही
टेमघर – ९१.५३ विसर्ग नाही
* उजनी धरणातील पाणीपातळी सायंकाळी ७ वा.
एकूण पाणीपातळी – 496.6२60 मी.
पाणीसाठा – 3263.27दलघमी(115.24टीमसी
उपयुक्त पाणीसाठा – 1461.18 दलघमी (51.59.टीमसी )
टक्केवारी – 96.26 टक्के
उजनीत येणारा विसर्ग
दौंड – 24348 क्युसेक
बंडगार्डन – 19719
उजनीतून सोडलेला विसर्ग
सीना माढा बोगदा – २०० क्युसेक्स
सीना माढा उपसा – २६२ क्युसेक्स
संपादन : संतोष वाघमारे – सुराज्य डिजिटल , टेंभुर्णी