मुंबई : राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १६,४०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा- १२३७ (३०), ठाणे- २३४ (९), ठाणे मनपा-२२८ (३), नवी मुंबई मनपा-४८८ (१), कल्याण डोंबिवली मनपा-३६६ (१४), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-१२, मीरा भाईंदर मनपा-१२० (१), पालघर-१५८ (८), वसई-विरार मनपा-१३१ (६), रायगड-३२२ (३),पनवेल मनपा-२३९ (२), नाशिक-३२५ (५), नाशिक मनपा- १०४९, मालेगाव मनपा-६३ (१), अहमदनगर-२८३ (७),अहमदनगर मनपा-१८७ (२), धुळे-८९ (२), धुळे मनपा-६९ (१), जळगाव- ६२५ (१०), जळगाव मनपा-१३०, नंदूरबार-२९ (५), पुणे- ९९१ (१२), पुणे मनपा- १६६३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा- १०७२ (२),
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर-३४५ (६), सोलापूर मनपा-४८, सातारा-६१६ (५), कोल्हापूर-६६९ (१६), कोल्हापूर मनपा-३०५ (१२), सांगली-३९३ (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-२९७ (१२), सिंधुदूर्ग-४८, रत्नागिरी-१६३ (५), औरंगाबाद-६३ (२),औरंगाबाद मनपा-५८ (४), जालना-६७, हिंगोली-१०, परभणी-४२, परभणी मनपा-२५ (४), लातूर-१५४ (३), लातूर मनपा-११५ (३), उस्मानाबाद-१०८ (२),बीड-१०४ (३), नांदेड-१८३ (४), नांदेड मनपा-१२८ (१), अकोला-२९ (२), अकोला मनपा-५२ (१), अमरावती-२८ (३), अमरावती मनपा-८६ (३) , यवतमाळ-९५ (१), बुलढाणा-४४, वाशिम-६३ , नागपूर-२२३ (५), नागपूर मनपा-८३६ (४०), वर्धा-६६, भंडारा-१०९, गोंदिया-४८, चंद्रपूर-११२, चंद्रपूर मनपा-१६४, गडचिरोली-७५, इतर राज्य १७ (२).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.
एकूण : बाधित रुग्ण-(७,८०,६८९) बरे झालेले रुग्ण-(५,६२,४०१), मृत्यू- (२४,३९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४१),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,९३,५४८)